AmravatiLatest News

विद्यार्थी संघटनांशी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी साधला संवाद

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये झालेल्या विद्यार्थी संघटनांच्या सभेत कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी विद्यार्थी समस्यांना सर्वोच्च प्राधान्य देत विद्यार्थी हिताच्या समस्या सोडविण्यात येतील असे आ·ाासन विद्यार्थी संघटनांना दिले.
मंगळवार दि. 20 जानेवारी रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती सभागृह येथे विद्यापीठ परिक्षेत्र अंतर्गत येणा-या पाचही जिल्ह्रांमधील विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची सभा संपन्न झाली. या सभेत विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी विद्याथ्र्यांच्या अनेक समस्या कुलगुरूंसमोर मांडतांना प्रश्न देखील उपस्थित केले. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सर्व प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यां आत्मियतेने ऐकून घेत विद्यार्थी हिताचे निर्णय विद्यापीठ सदैव घेत राहील आणि विद्याथ्र्यांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राध्यान्य दिले जाईल, असे कुलगुरूंनी विद्यार्थी संघटनांना आ·ास्त केले.

सभेला प्र-कुलगुरू डाॅ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर, डॉ. अविनाश बोर्डे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, विद्यार्थी विकास संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. राजीव बोरकर, अधिसभा सदस्य डॉ. रितेश खुलसाम, श्री अमोल ठाकरे, श्री कैलाश चव्हाण, श्री अमोल देशमुख, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर तसेच युवा सेनेचे योगेश सोळंके, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या कु. प्रतिक्षा ढोके, एन.एस.यु.आय.चे श्री संकेत शाहु, आकाश गेडाम, सचिव श्री अर्पित गौरखेडे, श्री शुभम बांबल, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, अकोलाचे अॅड. आकाश हिवराळे, आदित्य अवचार, विद्यार्थी सेनेचे इम्रान सय्यद, आय. वाय. सी. चे श्री कुणाल जोध, युवा स्वाभिमान पार्टीचे पंकज सुरडकर, कु. साक्षी उमक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे श्री निकेत कलाने, श्री अर्जून ठाकरे, तृष्णा चव्हाण आदी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन, प्रास्ताविक व आभार डॉ. राजीव बोरकर यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button