कुंभार समाजातील गुणवंत विद्याथांचा व समाजबांधवांचा सत्कार, आ. रवि राणा यांच्याकडून गोरोबा भवनासाठी २५ लक्ष देण्याची घोषणा

संत गोरोबा भवनामध्ये वाचनालय,ग्रामीण भागातील मुलामुलींच्या राहण्यासाठी खोल्या आदीच्या बांधकामासाठी मी २५ लक्ष रूपयाचा निधी देईल अशी घोषणा बडनेरा मतदार संघाचे आमदार रविभाऊ राणा यांनी केली. विर्दभ कुंभार समाज सुधार समिती अमरावतीच्यावतीने विर्द्याथ्यांना गुणगौरव सोहळयाल प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना ते म्हणाले. श्री संत गोरोबा काका सांस्कृतिक भवन शशी नगर अमरावती येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे अध्यक्ष श्री सुधाकरराव शेंडोकार,श्री संजयभाऊ गाते, प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा व भाजपा जिल्हाध्यक्ष वर्धा, डॉ श्रीराम कोल्हे, श्री पंजाबराव काकडे, श्री देविदासजी काळकर,प्रा.डाॅ.संजय साळविकर, सचिन इंगळे,श्रीमती प्रभाताई भागवत महिला अध्यक्षा,श्री भगवानजी जामकर,अरुणभाऊ चोंडके,प्रदीपजी मलीये दर्यापूर, श्री मारोतराव शेंडोकार अकोट, श्री वसंतराव जवळेकर, वर्धा, श्री बबनराव जगदाळे नवापूर नंदुरबार, श्री भगवान सुपडू सुर्यवंशी ठाणे, श्री गुलाबराव सोनोने मुंबई, सौ. वैशाली विलास नांदुरकर उपस्थित होते.
आ.राणा यांच्याहस्ते गुणवंत विर्द्याथ्यांचा सत्कार करण्यात आला. ते पुढे म्हणाले कुंभार समाजाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे समाज भवन अमरावतीत असल्याचा मला अभिमान आहे. गोरोबा काकाच्या नावाने बसस्टॉफ या ठिकाणी सुरू करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी यावेळी केली. कुंभार समाजाच्या आर्थिक महामंडळासाठी मी प्रयत्न करीत असून समाजाला न्याय देण्यासाठी मी कटीबद्ध आहे. कुंभार समाजासाठी केंद्र व राज्य सरकार कडून अनेक योजना सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली. कुंभार समाज गुणवंतांची खाण असून कुंभार समाजातून अनेक व्यक्ती मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत असल्याच अभिमान असल्याचे ते म्हणाले.
संजय गाते म्हणाले संत शिरोमणी माती कला बोर्ड कोरोनामध्ये मागे पडले. ते नियमित सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांकडे प्रयत्न करण्यात येईल व लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. ७०० ब्रास माती रॉयल्टी माफ करण्याचा शासन र्निणय र्निगमित झाला आहे. कुंभार समाज मायक्रो ओबीसी मध्ये मोडतो. या समाजाचे प्रतिनिधीत्व विधानसभेत नाही, त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगून गुणवंत मुलामुलींना त्यांनी शुभेच्छा दिल्यात.
यावेळी अतिथींच्याहस्ते समाजरत्न पुरस्कार श्री दत्तुजी दिगांबरराव डवरे, यांना तर श्री रविकांत विठ्ठलराव काकडे व श्री भगवान सुपडू सुर्यवंशी यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी १४ समाजबांधवांना समाजगौरव पुरस्कार तसेच ९० गुणवंता विद्याथ्य्रांचा व ४ सेवानिवृत्त बांधवांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह सत्कार करण्यात आला.
श्री सुधाकर शेंडोकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विदर्भ कुंभार समाज सुधार समितीची सद्यस्थिती,केलेले कार्य व समोर समाजोपयोगी करावयाच्या कामांची माहिती दिली.समाज बांधवांनी लोकवर्गणीतून समाज भवनाचे बरेचसे बांधकाम पूर्ण केले तरीही यापुढे हाॅलचे सुशोभीकरण व आधुनिक साधनं सोयीची कमतरता तसेच परिसर सौंदर्यीकरणाचे महत्वाचे काम बाकी असून या उर्वरित कामासाठी शासकीय निधी मंजूर करून हे काम आमदार विकास निधीतून पूर्ण करून द्यावे ही मागणी करण्यात आली.
गुणगौरव कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री संत गोरोबा काका मुर्तीचे पूजनाने करण्यात आली.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुधाकरराव शेंडोकार, प्रमुख पाहुणे मा.आमदार श्री रविभाऊ राणा व श्री संजयभाऊ गाते प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री सुरेन्द्र सरोदे यांनी, संचालन सौ.वैशाली नांदुरकर,सौ.प्रतिभा धामणकर व कु.प्राजक्ता जौंजाळ यांनी तर आभार प्रर्दशन संस्थेचे उपाध्यक्ष अॅड गजानन तांबटकर यांनी केले.
कार्यक्रमाला विदर्भ कुंभार समाज सुधार समितीचे पदाधिकारी कोषाध्यक्ष श्री सतिशराव गावंडे, सहसचिव श्री मधुकरराव खांडेकर, जिल्हाध्यक्ष श्री सुनील भागवत, विनोद मेहरे,मोहन नांदुरकर, नंदकिशोर नांदुरकर, नंदकिशोर काकडे, नंदकिशोर काळकर, दिनेश टेंभरे, गजानन गुजरे, गजानन माहुलकर, विनायकराव तायडे, विनोद काकडे,युवाध्यक्ष श्री रमेश अंबुलकर, श्री रमेशराव अ.अंबुलकर, गजानन काकडे, सुनील काळकर,
समाजोन्नती समितीचे कार्याध्यक्ष श्री सुरेशराव नांदुरकर, गोरोबा काका पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सौ.निर्मलाताई नांदुरकर,सचिव श्री अरुण पोहनकर, महिला मंडळाच्या सौ.सविता काकडे, सुषमा काकडे,मंजूताई काकडे, सुषमा काळकर,सुजाता तांबटकर व असंख्य कार्यकर्ते,सर्वांची नावे लिहणे येथे शक्य नाही त्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून आलेले सन्माननीय समाज प्रतिनिधी श्री अकोला येथून किशोरराव कापडे, संतोषराव सरोदे,प्रा.दिलीपराव अप्तुरकर, रामदासजी गाडेकर, रामचंद्रजी मेहरे, सुभाषराव तायडे, नंदुरबार येथून हृदयेशजी चव्हाण,छोटूभाई प्रजापती,दिनेशजी वाडीले, जळगाव येथून श्री चंद्रशेखर कापडे, सखारामजी मोरे, घनश्यामजी हरमकर, संतोषजी कापडे, रविंद्र प्रजापती,संजयजी पुन्नासे, प्रदीप सपकाळे,संजय कुंभार,स्वप्निल कापडे, गजाननराव मंगळकर,ओम व खुशी, अॅड बुलढाणा येथून श्री श्रीरामजी आमटे व सौ.सिंधुताई आमटे, निंबाजी कुंभार, बदलापूर येथून दिलीपराव राजे, तानाजी कुंभार नाशिक येथून तुळशिरामजी मोरे, गुलाबरावजी सोनोने व अशा अनेक जिल्ह्यातील समाज प्रतिनिधींनी कार्यक्रमात उपस्थित होते. गुणगौरव कार्यक्रमात महाराष्ट्रातील मुंबई पासून ते नागपुरपर्यंत अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी पालक, समाजातील सामजिक कार्यकर्ते, समाज बांधव व महाराष्ट्रातील कुंभार समाज संघटनेचे मुंबई, मराठवाडा, खानदेश, नाशिक व विदर्भातील अनेक जिल्ह्याचे अध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधी कार्यक्रमास उपस्थित होते.



