Maharashtra Politics

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

अमरावती, दि. 24 (जिमाका): आगामी अमरावती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 रोजी जाहीर केलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 59 निवडणूक विभाग आणि 118 निर्वाचक गणांसाठी मतदार यादीचे विभाजन करून पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येईल.
निवडणूक विभागनिहाय आणि निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि. 8 ऑक्टोबर 2025 प्रसिद्ध केली जाईल.
मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि. 8 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार असून दि. 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहणार आहे.
सर्व हरकती व सूचनांचा विचार करून, दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम व अधिप्रमाणित मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल.
या कार्यक्रमानुसार, सर्व प्रशासकीय यंत्रणांनी वेळेत कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button