Latest NewsMaharashtra

शिर्डी साई मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी; साई संस्थानने पोलिसांना दिली माहिती

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानला बॉम्बने मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा एक ई-मेल आला आहे. हा धमकीचा ई-मेल ‘भगवंत मान@यांडेक्स.कॉम’ या आयडीवरून पाठवण्यात आला आहे.

साईबाबा संस्थानने तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस आता सायबर तज्ज्ञांच्या मदतीने हा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. यापूर्वीही शिर्डीच्या साई संस्थानला अशा प्रकारच्या धमक्या फोनद्वारे किंवा ई-मेलद्वारे आल्या आहेत. प्रत्येक वेळी धमकी मिळताच पोलीस तात्काळ तपास सुरू करतात आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतात.

शिर्डीच्या साई मंदिराला दररोज मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. साईबाबांच्या दर्शनासाठी आणि साईचरणी लीन होण्यासाठी येथे प्रचंड गर्दी होते. त्यामुळे मंदिरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून, चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button