दस्तूरनगर झोनमध्ये मनपाची मोठी कारवाई – दोन ट्रक निळे गटई खोके जप्त
अमरावती : महापालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशान्वये आज दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झोन क्रमांक ३ अंतर्गत अतिक्रमण विरोधी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत चपराशीपुरा, कॅम्प, कॉर्नर सुंदरलाल चौक, वडाली परिसर, सर्किट हाऊस रोड, युनिव्हर्सिटी रोड या परिसरांतील अनधिकृत निळ्या गटई खोके हटविण्यात आले.
मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई दरम्यान २ ट्रक इतके गटई खोके जप्त करून समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात जमा केले. ही कारवाई विशेषतः ज्या ठिकाणी नागरिकांच्या व वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता अशा ठिकाणी केंद्रित करण्यात आली होती.
कारवाईदरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख श्याम चावरे, समाज कल्याण विभागाचे प्रतिनिधी श्री. तायडे, लिपिक श्री. शाहिबाज, तसेच अतिक्रमण कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अशा बेकायदेशीर संरचनांमुळे नागरी समस्यांमध्ये वाढ होत असून, नियमितपणे अशा कारवाया करून सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात येणार आहेत.
- कारवाई झालेले प्रमुख भाग:
- चपराशीपुरा
- कॅम्प
- सुंदरलाल चौक
- वडाली परिसर
- सर्किट हाऊस रोड
- युनिव्हर्सिटी रोड
- जप्त गटई खोके: अंदाजे २ ट्रक
- सहभागी अधिकारी व कर्मचारी:
- श्याम चावरे (अतिक्रमण पथक प्रमुख)
- श्री. तायडे (समाजकल्याण अधिकारी)
- श्री. शाहिबाज (लिपिक)
- अतिक्रमण कर्मचारी
मनपाचे आवाहन:
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम अथवा खोके उभारू नयेत. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल.



